किंग्स इलेव्हन पंजाब vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना होणार आहे. हा यंदाच्या मोसमातील दोन्ही संघांचा दुसरा सामना असेल. बँगलोरला मोसमाची विजयी सुरुवात करण्यात यश आले होते, तर पंजाबला मात्र पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पंजाबचा संघ आपला पहिला विजय मिळवण्यास उत्सुक आहे. मात्र, बॅंगलोरचा संघ त्यांना झुंज नक्कीच देईल. त्यामुळे हा सामना चुरशीचा होऊ शकेल.