कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायजर्स हैदराबाद प्रीव्ह्यू 

आज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद असा सामना होणार आहे. हा यंदाच्या मोसमातील दोन्ही संघांचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघांनी यंदाच्या मोसमाची सुरुवात पराभवाने केली होती. कोलकाताचा मुंबईने, तर हैदराबादचा बंगळुरूने पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांचा यंदाच्या मोसमातील आपला पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड असू शकेल यावर केलेली चर्चा.