Video: अनुकुलने घेतला ‘सुपरमॅन’ कॅच; निता अंबानींच्या प्रश्नाला दिलं भन्नाट उत्तर

Anukul Roy Catch

सूर्यकुमार यादवचं (Surya Kumar Yadav) अर्धशतक आणि जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्टच्या (Trent Boult) अचूक माऱ्यामुळे मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) ५७ धावांनी पराभूत करत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला. या सामन्यात सर्वात विशेष म्हणजे अनुकुल रॉयचा (Anukul Roy Catch) झेल. त्याने सुपरमॅन सारखी उड्डी मारत झेल घेतला. सामना जिंकल्यानंतर संघाची मालक नीता अंबानी यांनी फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्सचे तीन फलंदाज लवकर तंबूत परतले. राजस्थानने सुरुवातीच्या ८ षटकांत केवळ ४२ धावा केल्या. सामना पूर्णपणे मुंबईच्या हातात होता. ९ व्या षटकात राहुल चहर गोलंदाजी करायला आला. त्याच्या चेंडूवर महिपालने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणासाठी आलेला अनुकुल रॉय धावत आला आणि त्याने हवेत उड्डी मारुन झेल घेतला.

सामना जिंकल्यानंतर संघाची मालक नीता अंबानी यांनी खेळाडूंशी फोनवरुन संवाद साधत विजयाबद्दल अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी शानदार कॅच पकडणार्‍या अनुकुल रॉयशी बोलल्या. त्याने त्या खेळाडूला विचारले – तुला कसं वाटतंय? त्यावर अनुकुल म्हणाला, ‘मला खूप चांगलं वाटतं मॅम.’ त्याचं उत्तर ऐकून इतर खेळाडू हसले.