IPL 2020: राशिद खान धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारायला गेला अन्

आयपीएलच्या १३ व्या मोसमात मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने हा सामना २० धावांनी जिंकला. पण हैदराबादचा स्टार फिरकी गोलंदाज चर्चेत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट लावण्याच्या नादात राशिद खानने आपली विकेट गमावली.

राशीद खानने १८ व्या षटकांतील पाचव्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हेलिकॉप्टर शॉटच्या नादात तो हिट विकेट झाला. शिवाय त्या चेंडूवर झेलबाद देखील झाला. राशिद खानने ८ चेंडूत १४ धावा केल्या त्यामध्ये त्याने एक षटकार आणि एक चौकार ठोकला. आतापर्यंत आयपीएलमध्ये शानदार गोलंदाजी करणारा राशिद खान चेन्नईच्या विरोधात प्रभावी ठरलेला नाही. चार षटकांमध्ये राशिद खानने ३० धावा खर्च केल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

चेन्नईविरुद्ध झालेल्या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या अडचणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. हैदराबादने आतापर्यंत खेळलेल्या ५ पैकी पाच सामने गमावले आहेत. जर हैदराबाद संघाने आणखी दोन सामने गमावले तर ते जवळपास प्ले-ऑफ शर्यतीतून बाहेर पडतील.


हेही वाचा – iPhone 12, Pro आणि Pro Max लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत आणि फीचर्स