RCB vs KKR: कोलकताचा ११२ धावात खुर्दा; RCB ची विजयी घौडदौड कायम

डिव्हिलिअर्सच्या तडाखेबंद खेळी आणि गोलंदाजांचा अचूक माऱ्याच्या जोरावर बँगलोरने कोलकाताला हरवलं

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने कोलकताला ८२ धावांनी पराभूत करत विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. डिव्हिलिअर्सच्या तडाखेबंद खेळी आणि गोलंदाजांचा अचूक माऱ्याच्या जोरावर बँगलोरने कोलकाताला हरवलं. बॅंगलोरच्या बलाढ्य १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. कोलकताने २० षटकात ९ गड्यांच्या मोबदल्यात ११२ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर बँगलोरने हा सामना जिंकला.

बँगलोरच्या १९५ धावांचा पाठलाग करताना कोलकताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बँटनचा नवदीप सैनीने त्रिफळा उडवत माघारी धाडलं. त्यानंतर कोलकताचे फलंदाज ठराविक अंतराने स्वस्तात बाद झाले. शुभमन गिलने एका बाजूने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक चोरटी धाव घेताना तो धावचित झाला. गिलने २५ चेंडूत ३४ धावा केल्या. यामध्ये ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. आंद्रे रसेल आणि राहुल त्रिपाठीने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु षटकार मारण्याच्या नादात बाद झाले. बँगलोरकडून मॉरिस आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ बळी घेतले. सैनी, सिराज, चहल आणि उदाना यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

…आरसीबीला पहिला झटका दिला

शारजाह येथे झालेल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. फिंच आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीरांनी आरसीबीच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी ७.४ षटकांत ६७ धावांची भागीदारी रचली. अखेर फॉर्मात असलेल्या पडिक्कलला आंद्रे रसेलने बाद करत आरसीबीला पहिला झटका दिला. पडिक्कलने २३ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. तर फिंचला ४७ धावांवर प्रसिध कृष्णाने बाद केले. यानंतर मात्र कर्णधार कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी अप्रतिम फलंदाजी करत शतकी भागीदारी रचली. कोहलीने २८ चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. याऊलट डिव्हिलियर्सने फटकेबाजी करत ३३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावांची खेळी केली. त्यामुळे आरसीबीने २० षटकांत २ बाद १९४ अशी धावसंख्या उभारली. KKR कडून प्रसिध कृष्णा आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.


IPL 2020 : बॅड न्यूज! दिल्लीचा गोलंदाज ईशांत शर्मा आयपीएलमधून आऊट