घरIPL 2020SRH vs KXIP: बेअरस्टो-वॉर्नरचं वादळ; हैदराबादचा पंजाबवर मोठा विजय

SRH vs KXIP: बेअरस्टो-वॉर्नरचं वादळ; हैदराबादचा पंजाबवर मोठा विजय

Subscribe

बेअरस्टो आणि वॉर्नरच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबला ६९ धावांनी पराभूत केलं. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २०२ धावांचं आव्हान दिलं. २०२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं. मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना पंजाबला केवळ १३२ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून निकोलस पूरनने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर वॉर्नर-बेअरस्टोने १६० धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज मैदानात असताना हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असाताना रवी बिश्नोईने ही जोडी फोडत पंजाबला मोठं यश मिळवून दिलं. मधल्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. हैदराबादकडून वॉर्नरने ५२ तर जॉनी बेअरस्टोने ९७ धावा केल्या.  अब्दुल समद आणि केन विल्यमसन जोडीने फटकेबाजी करत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. परंतू रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर समदही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. प्रियम गर्गही अर्शदीपच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन जोडीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत पंजाबसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात मदत केली.  पंजाबकडून रवी बिश्नोईने ३, अर्शदीप सिंहने २ तर मोहम्मद शमीने १ बळी घेतला.

- Advertisement -

हैदराबादच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल चोरटी धाव घेताना लोकेश राहुलसोबत झालेल्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर प्रबसिमरन सिंह आणि कर्णधार लोकेश राहुलही ठराविक अंतराने माघारी परतले. कर्णधार राहुलला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळालं नाही. जोराचा फटका मारण्याच्या नादात सीमारेषेवर झेलबाद झाला. निकोलस पूरनने ग्लेन मॅक्सवेलसोबत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र, प्रियम गर्गच्या अचूत थ्रोवर चोरटी धाव घेताना मॅक्सवेल धावबाद झाला. निकोलस पुरनेन एक बाजू लावून धरली होती. मात्र, त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. पुरनने ३७ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. यानंतर पंजाबच्या तळातल्या फलंदाजांनी मैदानावर येण्याची औपचारिकता पूर्ण केली आणि हैदराबादचा विजय सोपा केला. हैदराबादकडून राशिद खानने ३, खलिल अहमद आणि टी. नटराजनने प्रत्येकी २ तर अभिषेक शर्मा १ बळी घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -