घरक्रीडाIPL 2020 : आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे बिगुल वाजणार आज!

IPL 2020 : आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे बिगुल वाजणार आज!

Subscribe

सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होईल.    

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वच खेळांचे वेळापत्रक बिघडले. अनेक स्पर्धा लांबणीवर पडल्या, तर काही स्पर्धा रद्द देखील कराव्या लागल्या. जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा ‘आयपीएल’ही याला अपवाद नव्हती. नेहमीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला मार्चच्या अखेरीस सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनामुळे बीसीसीआयला ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली. ही स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयचे मोठे आर्थिक नुकसान झाले असते. त्यामुळे त्यांनी बरीच चर्चा करून यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये आयोजित करण्याचे निश्चित केले. आता तो दिवस आला आहे. शनिवारी या स्पर्धेला सुरुवात होणार असून सलामीची लढत गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे.

यंदाचे आयपीएल नेहमीपेक्षा वेगळे

आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा. त्यामुळे चाहते ही स्पर्धा स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यास उत्सुक असतात. यंदा मात्र कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच चिअरलिडर्सचा डान्स व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. प्रेक्षक स्टेडियममध्ये प्रत्यक्षात उपस्थित राहणार नसले, तरी त्यांची उणीव भासू नये म्हणून काही संघांनी चाहत्यांचे चिअर करतानाचे व्हिडिओ आधीच तयार करून ठेवले आहेत. ते सामन्यादरम्यान लावण्यात येतील. त्यामुळे यंदाचे आयपीएल नेहमीपेक्षा वेगळे असणार आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांविना आयपीएल होण्याची पहिलीच वेळ  

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून भारतातील सर्वच खेळांच्या स्पर्धा बंद होत्या. मात्र, आता आयपीएल स्पर्धेपासून भारतातील स्पर्धांनाही सुरुवात होत आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा युएईतील अबू धाबी, दुबई आणि शारजाह येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा युएईमध्ये होण्याची ही दुसरी वेळ असली तरी प्रेक्षकांविना होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -