IPL 2020: तर सुनिल नरिनच्या गोलंदाजीवर येणार बंदी

ipl 2020 Sunil Narine reported for suspect action again, placed in warning list,

IPL 2020 मध्ये शनिवारी झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने दोन धावांनी पराभूत केलं. पंजाबला शेवटच्या षटकांत १४ धावांची आवश्यकता होती. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने पंजाबला रोखण्यासाठी सुनिल नरिनच्या हातात चेंडू सोपावला. सुनिल नरिनने कर्णाधाराचा विश्वास सार्थ ठरवत पंजाबला १६२ धावांवर रोखत २ धावांनी संघाला विजयी केलं. संपूर्ण सामन्यात नरिनने उत्कृष्ट गोलंदाजी केली. मात्र, त्याची गोलंदाजी पंचांना संशयास्पद वाटली. या सामन्यात नरिनने ४ षटकांत २८ धावा देत २ बळी टिपले.

सुनिल नरिनने चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवण्यात हातभार लावला. परंतु, पंचांनी सामना संपल्यानंतर सुनील नरिनची गोलंदाजीची शैली ही संशयास्पद असल्याचं निरीक्षण नोंदवलं. BCCI ने प्रसिद्ध पत्रक जारी करत सांगितलं आहे. सुनील नरिनच्या गोलंदाजीची शैली ही आक्षेपार्ह असल्याचा अहवाल पंचांनी दिला असल्याचं BCCI ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. संशयास्पद गोलंदाजी शेलीबाबतच्या नियमांचा आधारावर हा आक्षेप नोंदवला आहे. या आक्षेपानंतर सुनिल नरिनला ‘वॉर्निंग लिस्ट’मध्ये टाकण्यात आलं आहे. असं असलं तरी त्याला सध्या स्पर्धेत गोलंदाजी करता येणार आहे. मात्र, पुन्हा एकदा नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत संशय व्यक्त करून पंचांनी आक्षेप नोंदविला, तर BCCIच्या नियमांनुसार गोलंदाजीची शैली निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र मिळेपर्यंत त्याला IPLच्या यंदाच्या हंगामात गोलंदाजी करता येणार नाही, असंही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.


हेही वाचा – आता ‘विमेन्स टी-२० चॅलेंज’ स्पर्धा रंगणार; BCCI ने वेळापत्रक केलं जाहीर