या कारणांमुळे यूएईच्या मैदानावर दिसणार फिरकीची जादू

The magic of spin will be seen on the field of UAE

आयपीएलच्या १३ व्या मोसमाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल यूएईमध्ये होणार आहे. यावर्षी आयपीएलचे सर्व सामने केवळ तीन मैदानांवर खेळवले जाणार आहेत. युएईच्या खेळपट्ट्या आधीपासूनच संथ गतीसाठी ओळखल्या जातात. तज्ज्ञांच्या मते, स्पर्धा जसजशी पुढे जाईल तशी खेळपट्टी अजून संथ होतील. याचा फायदा फिरकीपटूंना आणि धिम्या गोलंदाजांना होणार आहे.

संथ खेळपट्ट्यांमुळे चेंडू हवा तसा बॅटवर येणार नाही आहे. अशा परिस्थितीत क्यूरेटर्स आणि ग्राउंडमनचं काम अत्यंत आव्हानात्मक असेल. दुबई, शारजाह आणि अबू धाबीच्या खेळपट्ट्या संथ गतीच्या असल्याचं बीसीसीआयचे माजी मुख्य क्युरेटर्स दलजित सिंग यांनी कबूल केलं आहे. सुरुवातीला धावांचा पाऊस पडेल पण त्यानंतर मात्र खेळपट्टी संथ होईल. स्पर्धा बरीच मोठी आहे आणि खेळपट्ट्या कमी आहेत. यामुळे खेळपट्ट्यांची काळजी कशी घेतली जाते आणि हेवी रोलरचा योग्य प्रकारे वापर केला तर फरक पडेल. हेवी रोलरचा जास्त वापर केल्यास खेळपट्ट्या संथ होतात.


हेही वाचा – AAP नेत्याची गाडीतच विष प्राशन करुन आत्महत्या