घरक्रीडाआयपीएलच्या १३व्या सीजनचं बिगुल वाजलं; पहिला सामना...!

आयपीएलच्या १३व्या सीजनचं बिगुल वाजलं; पहिला सामना…!

Subscribe

आयपीएल २०२० अर्थात आयपीएलच्या १३व्या सीजनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

दरवर्षी क्रिकेट प्रेमींसाठी सर्वात जास्त प्रतिक्षा असते ती म्हणजे आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यांची! आत्तापर्यंत आयपीएलचे १२ सीजन झाले असून १३वा सीजन पुढील वर्षी २०२०मध्ये होणार आहे. त्यामुळे २०२०मध्ये होणाऱ्या या २०-२० सामन्यांच्या सीजनची सगळ्यांनाच प्रतिक्षा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २९ मार्च, २०२० रोजी आयपीएलच्या १३व्या सीजनचा पहिला सामना होणार आहे. मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आयपीएलचं उद्घाटन आणि पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारताचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा त्याच्या घरच्या मैदानावरून त्याच्या संघाच्या म्हणजेच मुंबई इंडियन्सच्या १३व्या सीजनला सुरुवात करणार आहे.

दरम्यान, याच काळात ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड आणि इंग्लंड वि. श्रीलंका या मालिका सुरू असणार आहेत. त्यामुळे या चारही देशांमधले काही खेळाडू आयपीएलच्या उद्घाटनाच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. मात्र, ३१ मार्चपर्यंत हे सामने संपणार असल्यामुळे त्यानंतर हे खेळाडू उपलब्ध होऊ शकणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -