VIDEO: Mumbai Indians खेळाडूंची समुद्र किनारी ‘फुल टू धमाल’

आयपीएल खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ युएईमध्ये दाखल झाला असून सध्या हा संघ समुद्र किनारी 'फुल टू धमाल' करताना दिसत आहे.

ipl 2020:mumbai indians players indulge in beach football to beat heat in uae
VIDEO: Mumbai Indians खेळाडूंची समुद्र किनारी 'फुल टू धमाल'
Advertisement

आयपीएल खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ युएईमध्ये दाखल झाला असून सध्या या संघाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू समुद्र किनारी फुल टू धमाल करताना दिसत आहेत.

युएईमध्ये सध्याच्या घडीला वातावरण उष्ण आहे. त्यामुळे दिवसा सराव करणे खेळाडूंना कठीण होत आहे. त्यामुळे दिवसा समुद्र किनाऱ्यावर जाऊन धमाल करायचे त्यांनी ठरवले आहे. सध्या संघातील खेळाडू फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटत आहेत.

युएईमध्ये सध्याच्या घडीला ३८-४० डिग्री एवढे तापमान आहे. त्यामुळे दिवसा सराव करणे शक्य होत नसल्याने त्यांनी आता समुद्रकिनारी जाऊन सराव करण्याचे ठरवले आहे. तसेच त्यांना यातून फिटनेससाठीही मदत होणार आहे.

आयपीएल काही दिवसांवर आली आहे. पण, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच खेळाडू घरात होते. त्यामुळे त्यांना मैदानात सरावही करता आलेला नाही. विशेष म्हणजे बऱ्याच दिवसांनी खेळाडू एकत्र येत असून त्यांच्यामध्ये चांगले वातावरण निर्माण व्हावे आणि त्यांनी एकमेकांना समजून घ्यावे, यासाठी संघ काही ना काही गोष्टी करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

❤️

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

मुंबई इंडियन्समधील रोहित शर्माबरोबर काही खेळाडू आपल्या कुटुंबियांना घेऊन युएईमध्ये दाखल झाले आहेत. रोहितची पत्नी रितिका सचदेवने आपल्या इंस्टाग्रामवर मुलगी समायराचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये समायरा हातामध्ये माईक घेऊन मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रितिका समायराला काही गोष्टी बोलायला सांगत आहे. आपल्या आईचे बोलणे ऐकून समायरा ही बोबड्या शब्दांमध्ये ते शब्द बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्माही पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांनी या व्हिडीओमध्ये ठराविक अंतर ठेवण्याच्या नियमाचे पालनही केले आहे.


हेही वाचा – Nations League : निकोलो बारेलाचा गोल; इटलीचा हॉलंडवर विजय