घरक्रीडाआयपीएल लिलाव : ३३२ खेळाडूंची अंतिम यादी

आयपीएल लिलाव : ३३२ खेळाडूंची अंतिम यादी

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या मोसमासाठी खेळाडू लिलाव १९ डिसेंबरला कोलकात्यात होणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी सुरुवातीला जगभरातील एकूण ९७१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अंतिम यादीत ३३२ खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या ३३२ खेळाडूंपैकी १८६ खेळाडू भारतीय, तर १४६ खेळाडू परदेशी आहेत. तसेच या यादीत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या १९ खेळाडूंचा समावेश आहे. तसेच मूळ यादीत नसलेल्या विंडीजचा केसरिक विल्यम्स, बांगलादेशचा मुशफिकूर रहीम, ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झॅम्पा यांनाही अंतिम यादीत स्थान देण्यात आले आहेत.

- Advertisement -

यंदाच्या लिलावात खेळाडूंची सर्वोच्च मूळ किंमत २ कोटी इतकी आहे. या श्रेणीत पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड, क्रिस लिन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेन स्टेल आणि अँजेलो मॅथ्यूज यांचा समावेश आहे. सर्वोच्च मूळ किंमत असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पा (१.५ कोटी) अग्रक्रमांकावर आहे. नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावचाही अंतिम यादीत समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत सत्यजितने १५ गडी बाद करत आयपीएल संघांचे लक्ष वेधून घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -