वर्ल्डकपनंतर आयपीएल सर्वोत्तम!

 जॉस बटलरचे विधान

Mumbai
buttler

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेमुळे केवळ भारतच नाही, तर इंग्लंडमधील क्रिकेटच्या प्रगतीला हातभार लागला आहे असे मत इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलरने व्यक्त केले. तसेच आयसीसी विश्वचषकांनंतर आयपीएल हीच जगातील सर्वोत्तम स्पर्धा आहे असे त्याने नमूद केले. आयपीएलचा यंदाचा मोसम करोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, परिस्थितीत सुधारणा होईल आणि यंदा आयपीएल होईल अशी त्याला आशा आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.

मागील काही वर्षांत इंग्लंडचे बरेच क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळले आहेत. आयपीएलमुळे इंग्लंड क्रिकेटच्या प्रगतीला हातभार लागला आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो. मी यंदाही या स्पर्धेत खेळण्यास आतुर होतो. कारण, माझ्या मते विश्वचषकानंतर आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेत जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळतात. बंगळुरूच्या संघात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांसारखे फलंदाज आहेत आणि त्यांना जसप्रीत बुमराह, डेल स्टेन, लसिथ मलिंगा यांसारख्या अप्रतिम गोलंदाजांविरुद्ध खेळताना पाहणे ही एक मेजवानी असते, असे बटलर म्हणाला. तसेच इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आता वेळ मिळतो याचे श्रेय केविन पीटरसनला जाते असेही बटलरने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here