घरक्रीडापरदेशी खेळाडूंविना आयपीएल नको - नेस वाडिया

परदेशी खेळाडूंविना आयपीएल नको – नेस वाडिया

Subscribe

माझ्या मते, ही जगातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंविना या स्पर्धेचे आयोजन होऊ शकत नाही, असे किंग्स इलेव्हन पंजाबचे संघमालक नेस वाडिया म्हणाले.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आहे. जगभरात या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंविना या स्पर्धेचे आयोजन करणे अश्यकच आहे, असे मत किंग्स इलेव्हन पंजाबचे संघमालक नेस वाडिया यांनी व्यक्त केले. तसेच करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत नाही, तोपर्यंत बीसीसीआय यंदाच्या आयपीएलच्या तारखा ठरवू शकत नाही असेही वाडिया यांना वाटते. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. परंतु, ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास बीसीसीआय ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन करु शकेल.

आयपीएल ही भारतीयांनी तयार केलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. माझ्या मते, ही जगातील सर्वात महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंविना या स्पर्धेचे आयोजन होऊ शकत नाही. मात्र, आता बऱ्याच देशांत प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या देशातील खेळाडू यंदा ही स्पर्धा खेळू शकतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआयला या स्पर्धेचे आयोजन कधी करायचे हे आताच ठरवणे अवघड आहे. उद्या जर करोनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर काय करणार? पुढील योजना काय असणार? या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल, असे वाडिया म्हणाले.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल स्पर्धा केवळ भारतीय खेळाडूंसह घ्यावी असा प्रस्ताव राजस्थान रॉयल्स संघाने ठेवला होता. परंतु, याला चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब संघाने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सध्या बीसीसीआयपुढे बरेच प्रश्न आहेत. दोन महिने क्रिकेटचे सामने न झाल्याने बीसीसीआयचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच आता आयपीएलही न झाल्यास त्यांचे ४००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकेल.

करोनावर नियंत्रण मिळवल्यानंतरच आयपीएल!  

काही जाणकारांनी जुलै-ऑगस्टमध्ये करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सध्या करोना व्यतिरिक्त कसलाही विचार करणे योग्य नाही असे नेस वाडिया यांना वाटते. करोनाशी आपल्याला एक-दोन किंवा आणखीही काही महिने लढा द्यावा लागू शकेल. या विषाणूवर नियंत्रण मिळवल्यानंतरच गोष्टी स्पष्ट होतील आणि आयपीएल कधी घ्यायची याचा निर्णय घेता येईल. यंदा आयपीएल नक्कीच होऊ शकेल. परंतु, किमान दोन महिने तरी आपण केवळ करोनाला लढा देण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजेत, असे वाडिया यांनी नमूद केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -