घरक्रीडाअखेर राजीव शुक्लांच्या सहाय्यकाचा राजीनामा

अखेर राजीव शुक्लांच्या सहाय्यकाचा राजीनामा

Subscribe

आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांचा सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफीवर टीममध्ये निवड व्हावी म्हणून वेश्या पुरवण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणीच त्याने राजीनामा दिला असून शुक्लांनी तात्काळ हा राजीनामा स्विकार केला आहे.

आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांचा सहकारी मोहम्मद अक्रम सैफीवर लाच घेण्याचा तसेत वेश्या पुरवण्याची मागणी करण्याचा आरोप उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू राहुल शर्मा याने केला होता. यासंबधित एक फोन टेपदेखील मीडियाद्वारे समोर आली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी बीसीसीआयकडून केल्यानंतर सैफीला तात्काळ राजीनामा द्यावा लागला आहे. उत्तर प्रदेश संघात सिलेक्शन करण्यात यावे यासाठी सैफीने शर्माकडे लाच आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वेश्या पाठवण्याची मागणी केली होती.

न्युज १ या हिंदी वृत्तवाहिनीवर मोहम्मद सैफी आणि क्रिकेटपटू राहुल शर्मा यांच्यातील संभांषणाची फोन टेप चालवली गेली होती. त्यांचे संभाषण आणि इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार असे कळते की, सैफी खेळाडूंना वयाचे बनावट  प्रमाणपत्र देखील पुरवतो ज्याने ते कमी वयाच्या वयोगटाच्या सामन्यात देखील खेळू शकतील. सैफीवर करण्यात आलेल्या या सर्व आरोपानंतर त्याने लगेचच शुक्ला यांना आपला राजीनामा दिला आणि सैफीचा राजीनामा शुक्लांकडूनही तात्काळ स्वीकारण्यात आला असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. राजीव शुक्ला हे उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे संचालक आणि त्यासोबतच आयपीएलचे अध्यक्ष देखील आहेत.

- Advertisement -

या सर्व प्रकरणाची चौकशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करत आहे. बीसीसीआयचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीयू) या प्रकरणात विशेष लक्ष घातले असून एसीयूचे प्रमुख अजित सिंग यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ”आम्ही सैफी आणि राहुल शर्मा यांच्यातील फोन कॉलची तपासणी करत आहोत आणि जोवर आम्ही सर्व प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत नाही, तोपर्यंत कोणत्याही अंतिम निर्णयावर आम्ही पोहोचणार नाही.”

त्यासोबतच बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी मोहम्मद सैफीवर बीसीसीआयच्या नियम आणि अटींमधील नियम क्रमांक ३२ च्या नुसार त्याच्यावरील सर्व आरोपासंदर्भात स्पष्टीकरण मागितले असून पुढील १५ दिवसांत त्याला हे स्पष्टीकरण देणे अनिवार्य आहे. अन्यथा त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे देखील खन्ना यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -