घरIPL 2020IPL मुळे राहुल तेवातियासारखे खेळाडू पुढे येऊ शकले - राहुल द्रविड

IPL मुळे राहुल तेवातियासारखे खेळाडू पुढे येऊ शकले – राहुल द्रविड

Subscribe

तेवातिया स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करतो.

युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमाची नुकतीच सांगता झाली. मुंबई इंडियन्स संघाने यंदा पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. त्यामुळे दिल्लीची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. मात्र, दिल्लीच्या संघाने आणि त्यांच्या युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केले. केवळ दिल्लीच नाही, तर इतरही संघांच्या काही युवा खेळाडूंनी छाप पाडली. यात राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवातियाचाही समावेश होता. तेवातिया स्थानिक क्रिकेटमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करतो. हरियाणा हा फार मोठा संघ मानला जात नाही. त्यामुळे तेवातियासारख्या खेळाडूला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आयपीएल स्पर्धेची मदत होते, असे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला वाटते.

पूर्वी रणजी करंडकासाठी संघात निवड व्हावी म्हणून खेळाडूंना राज्य क्रिकेट असोसिएशनवर अवलंबून राहावे लागायचे. त्यामुळे खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी फारशा संधी मिळत नव्हत्या. मात्र, आता आयपीएल स्पर्धेमुळे युजवेंद्र चहल, अमित मिश्रा, जयंत यादव आणि आता राहुल तेवातिया असे हरियाणाचे प्रतिभावान फिरकीपटू पुढे येऊ शकले आहेत. आता खेळाडूंना संधी मिळावी यासाठी केवळ राज्य क्रिकेट संघटनांवर अवलंबून राहावे लागत नाही, असे द्रविड म्हणाला. तेवातियाने यंदाच्या आयपीएल मोसमात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत चमक दाखवली. राजस्थानकडून खेळताना त्याने १४ सामन्यांत २५५ धावा केल्या, तसेच १० विकेट घेतल्या. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ५३ धावांची आक्रमक खेळी केली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -