घरक्रीडाआयपीएल भारताबाहेर?

आयपीएल भारताबाहेर?

Subscribe

बीसीसीआय करतायेत सर्व पर्यायांचा विचार

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाच्या २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर हा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आल्यास या काळात आयपीएल घेण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. आयपीएल न झाल्यास बीसीसीआयचे खूप मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे भारतात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश न आल्यास बीसीसीआय ही स्पर्धा भारताबाहेर घेण्याबाबत विचार करत आहे.

आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआय सर्व पर्यायांचा विचार करत आहे. यंदा आयपीएल भारताबाहेर घ्यावे लागले, तर तेसुद्धा करण्याची बीसीसीआयची तयारी आहे. परंतु, हा शेवटचा पर्याय असेल. आम्ही यापूर्वीही परदेशात आयपीएलचे आयोजन केले होते. परंतु, ही स्पर्धा भारतातच व्हावी यासाठी बीसीसीआय पूर्ण प्रयत्न करेल, असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजले. याआधी २००९ मध्ये आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत पार पडली होती. तर २०१४ मध्ये आयपीएलचे काही सामने युएईत झाले होते.

- Advertisement -

अजून कोणताही निर्णय नाही!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यावर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्वचषकाबाबतचा निर्णय १० जूनला होणार्‍या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. या स्पर्धेबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाचा निर्णय घेऊ शकत नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आयपीएलबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. टी-२० विश्वचषकाबाबत अधिक स्पष्टता आल्यानंतरच बीसीसीआय पुढील निर्णय घेईल, असे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -