घरक्रीडाIPL Team Preview : चेन्नई सुपर किंग्स 

IPL Team Preview : चेन्नई सुपर किंग्स 

Subscribe

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली असून त्यांनी आणखी पाच वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या संघाला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले असे कधीही झालेले नाही. यंदा मात्र यशस्वी होण्यासाठी त्यांनी अधिक मेहनत करावी लागू शकेल.

कोरोनाचा सर्वाधिक फटका कोणत्या आयपीएल संघाला बसला असेल, तर तो म्हणजे चेन्नईचा संघ. युएई गाठल्यानंतर चेन्नईच्या संघाला नेट्समध्ये सराव करण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. याचे कारण म्हणजे त्यांच्या १३ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती, ज्यात दोन खेळाडूंचा समावेश होता. त्यातच त्यांचे दोन अनुभवी खेळाडू फलंदाज सुरेश रैना आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग यंदा आयपीएलमध्ये खेळणार नाही. मात्र, यानंतरही चेन्नईला आयपीएल जिंकण्याचे दावेदार मानले जात आहे.

- Advertisement -

चेन्नईकडे धोनीसारखा खमका कर्णधार आहे. तसेच या संघात शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहिर, डू प्लेसिस, रविंद्र जाडेजा, अंबाती रायडू यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितीत या खेळाडूंना त्यांचा खेळ अधिक उंचावावा लागणार आहे. या संघात बरेच उत्कृष्ट फिरकीपटू असून त्यांना युएईतील खेळपट्ट्या फायदेशीर ठरू शकतील.


संघ – भारतीय खेळाडू : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केदार जाधव, रविंद्र जाडेजा, पियुष चावला, करण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, दीपक चहर, केएम असिफ, नारायण जगदीसन, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, साई किशोर

- Advertisement -

परदेशी खेळाडू : ड्वेन ब्राव्हो, सॅम करन, शेन वॉटसन, जॉश हेझलवूड, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहिर, लुंगी इंगिडी, मिचेल सँटनर    

जेतेपद – तीन वेळा (२०१०, २०११, २०१८)

सलामीचा सामना – वि. मुंबई (१९ सप्टेंबर)  

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -