घरक्रीडाIPL Team Preview : किंग्स इलेव्हन पंजाब 

IPL Team Preview : किंग्स इलेव्हन पंजाब 

Subscribe

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

आयपीएलच्या प्रत्येक मोसमाआधी सर्वाधिक बदल करणारा कोणता संघ असेल, तर तो म्हणजे किंग्स इलेव्हन पंजाब. यंदा या संघात खेळाडू फारसे बदलले नसले, तरी या संघाला लोकेश राहुलच्या रूपात नवा कर्णधार लाभला आहे. आयपीएल किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेत एखाद्या संघाचे नेतृत्व करण्याची राहुलची ही पहिलीच वेळ आहे. असे असले तरी त्याच्यावर दबाव कमी असणार नाही. पंजाबला अजून एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यंदाही पंजाब आयपीएल जिंकले, असे वाटणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. परंतु, या लोकांना चुकीचे ठरवण्यासाठी राहुलचा संघ नक्कीच उत्सुक असेल.

या संघात राहुलसोबतच क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल,  निकोलस पूरन, मयांक अगरवाल यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. गेल आता कारकिर्दीच्या शेवटाला असला, तरी अजूनही तो कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करण्यात सक्षम आहे. त्यामुळे तो चांगली कामगिरी करत राहुलला उत्तम साथ देईल अशी चाहते आणि पंजाब संघाला नक्कीच आशा असेल. गोलंदाजी ही या संघाची कमकुवत बाजू म्हणता येईल. मोहम्मद शमी वगळता या संघात मॅचविनर म्हणता येईल असा गोलंदाज नाही. मात्र, लेगस्पिनर रवी बिष्णोईवर नजर ठेवावी लागेल. या युवा गोलंदाजात बरीच क्षमता असून त्याला अनिल कुंबळेच्या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल.

- Advertisement -

संघ- भारतीय खेळाडू : लोकेश राहुल (कर्णधार), कृष्णप्पा गौथम, करुण नायर, मोहम्मद शमी, रवी बिष्णोई, मनदीप सिंग, मयांक अगरवाल, दीपक हूडा, दर्शन नलकांडे, सर्फराज खान, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, सुचित, मुरुगन अश्विन, तजिंदर सिंग, ईशान पोरेल, सिमरन सिंग 

परदेशी खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, क्रिस जॉर्डन, क्रिस गेल,हार्डस विल्योन,जिमी निशम,   

- Advertisement -

जेतेपद – एकदाही नाही 

सलामीचा सामना – वि. दिल्ली (२० सप्टेंबर) 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -