घरक्रीडाIPL Team Preview : कोलकाता नाईट रायडर्स 

IPL Team Preview : कोलकाता नाईट रायडर्स 

Subscribe

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

मागील काही वर्षांत आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी संघांपैकी एक म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स. गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकाताने २०१२ आणि २०१४ असे दोनदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतरच्या पाचपैकी तीन मोसमांत या संघाने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांना ही स्पर्धा जिंकता आली नाही. यंदा मात्र दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात आयपीएलचे तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यास कोलकाता संघ नक्कीच उत्सुक असेल.

या संघात ‘टी-२० स्पेशॅलिस्ट’ असणाऱ्या आंद्रे रसेल आणि सुनील नरीन या खेळाडूंचा समावेश आहे. आपल्या फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रसेलने मागील मोसमात ५७ च्या सरासरी आणि २०५ च्या स्ट्राईक रेटने १४ सामन्यांत ५१० धावा चोपून काढल्या होत्या. तो यंदाही या कामगिरीची पुनरावृत्ती करेल अशी कोलकाता संघाला नक्कीच आशा असेल. त्याला फलंदाजीत दिनेश कार्तिक, शुभमन गिल, इयॉन मॉर्गन यांची साथ लाभेल.

- Advertisement -

मागील मोसमात कोलकाताकडे अखेरच्या षटकांत धावा रोखू शकेल असा वेगवान गोलंदाज नव्हता. त्यामुळे त्यांनी खेळाडू लिलावात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला तब्बल १५.५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. त्याच्या अनुभवाचा कमलेश नागरकोटी, प्रसिध कृष्णा, शिवम मावी या युवा गोलंदाजांनाही फायदा होईल. तसेच युएईतील फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या नरीन, कुलदीप यादव यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतील.


संघ – भारतीय खेळाडू : दिनेश कार्तिक (कर्णधार), कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, नितीश राणा, प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, निखिल नाईक, एम सिद्धार्थ

- Advertisement -

परदेशी खेळाडू : आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, सुनील नरीन, पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, टॉम बँटन, क्रिस ग्रीन, अली खान 

जेतेपद – दोन वेळा (२०१२, २०१४) 

सलामीचा सामना – वि. मुंबई (२३ सप्टेंबर)

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -