घरक्रीडाIPL Team Preview : मुंबई इंडियन्स

IPL Team Preview : मुंबई इंडियन्स

Subscribe

यंदा आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा युएईमध्ये पार पडणार आहे. मात्र, युएई आणि भारतातील खेळपट्ट्यांमध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे यंदाही गतविजेत्या मुंबई इंडियन्सला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमांत मुंबईला फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, २०१३ मध्ये रोहित शर्माची या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आणि त्याच्या नेतृत्वात मुंबईने मागील सात पैकी चार मोसमांत आयपीएलचे जेतेपद पटकावले.

मुंबईच्या संघाला यंदा वानखेडे स्टेडियममध्ये खेळता येणार नाही, जिथे त्यांना चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळतो. मात्र, या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. त्यामुळे चाहत्यांच्या पाठिंब्याविनाही या संघामध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. मुंबईच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार रोहितसह क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव या अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावर असेल.

- Advertisement -

आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाच्या स्पर्धेत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे प्रामुख्याने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांना फिरकीपटू राहुल चहर आणि कृणाल पांड्या, तसेच मिचेल मॅक्लेनघन,जेम्स पॅटिन्सन आणि कुल्टर-नाईल या परदेशी वेगवान गोलंदाजांची साथ लाभेल. मुंबईच्या संघाला कधीही सलग दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा मात्र हे चित्र बदलण्यास ते नक्कीच उत्सुक असतील.


संघ – भारतीय खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार),आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय सिंह, मोहसिन खान

- Advertisement -

परदेशी खेळाडू : किरॉन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, मिचेल मॅक्लेनघन, क्विंटन डी कॉक, जेम्स पॅटिन्सन, शर्फेन रुदरफोर्ड, नेथन कुल्टर-नाईल, क्रिस लिन

जेतेपद – चार वेळा (२०१३, २०१५, २०१७, २०१९)

सलामीचा सामना – वि. चेन्नई (१९ सप्टेंबर)

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -