दोन ओळीत डोकं गरगरलं, धोनीवर पूर्ण पुस्तक वाचालात तर चक्कर येईल

IPL च्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतू त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. फलंदाजी करताना उष्ण वातावरणामुळे आलेला थकवा आणि धापा टाकणारा धोनी हे चित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं.

यावरुन भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने धोनीचं नाव न घेता टोला लगावला होता. वय हे काहींसाठी फक्त आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण असतं, असं सणसणीत टोला इरफान पठाणने लगावला.

पठाणच्या ट्विटनंतर धोनीच्या चाहत्यांनी पठाणला ट्रोल केलं. पठाणने देखील ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे.