घरIPL 2020ईशान किशन धोनीची जागा घेऊ शकतो; निवड समितीच्या माजी प्रमुखांचं विधान

ईशान किशन धोनीची जागा घेऊ शकतो; निवड समितीच्या माजी प्रमुखांचं विधान

Subscribe

मुंबई इंडियन्सने आयपीएलचा तेराव्या मोसम जिंकत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात मुंबईने दिल्लीवर ५ गडी राखून विजय मिळविला. अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक आणि मधल्या फळीत ईशान किशनने केलेली फटकेबाजी याच्या जोरावर मुंबईने अंतिम सामना सहज जिंकला. यंदाच्या मोसमात ईशान किशनने चांगली कामगिरी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या मते ईशान किशन हा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झाला आहे. तो एकदिवसीय आणि टी-२० संघात धोनीची जागा घेऊ शकतो, असे मत एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर धोनी वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. धोनीच्या जागी निवड समितीने रिषभ पंतला यष्टीरक्षणाची संधी दिली, परंतू वर्षभरात पंतने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुल आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय भारतीय संघाने आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहेत. मात्र, आता ईशान किशन देखील यांच्या रांगेत आला आहे. यंदाच्या मोसमात किशनने सलामीवीरपासून सर्व क्रमांकावर फलंदाजी करत मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार झालो आहे, असे सांगण्याचा प्रय्त्न केला आहे. हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे.

- Advertisement -

“इशान किशनसारख्या छोट्या चणीच्या खेळाडूला फटकेबाजी करताना पाहणे खरेच आश्वासक आहे. यंदाचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी चांगला गेला आहे. सुरुवातीला चौथ्या क्रमांकावर आणि जिथे गरज असेल तिकडे सलामीला येऊनही त्याने आपल्यातले गुण सिद्ध केले आहेत. संघाला गरज असेल त्याप्रमाणे आपल्या फलंदाजीत बदल करुन खेळ करण्याचे त्याचे कौशल्य वाखणण्याजोगे आहे. त्यामुळे भारतीय संघात टी-२० आणि वन-डे संघात त्याला धोनीच्या जागेवर स्थान मिळू शकते.” प्रसाद टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे.

ईशान किशन अशाच पद्धतीने यष्टीरक्षण करुन फलंदाजी करत असेल तर भारतीय संघात त्याला नक्कीच जागा मिळेल. २०१८ साली झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने ईशान किशनसाठी ६.२ कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या तेराव्या हंगामात इशान किशनने ५१६ धावा केल्या. संघात रोहित शर्मा नसताना सलामीला तर रोहित शर्मा आल्यानंतर मधल्या फळीत…अशा प्रत्येक ठिकाणी ईशान किशनने आपली छाप पाडली आहे. ईशान किशनच्या दमदार कामगिरीने भारतीय संघाची दारे आता उघडली जातात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -