घरक्रीडाविश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा

विश्वचषकासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा

Subscribe

३० मेपासून सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडने आपल्या अंतिम संघाची घोषणा केली आहे. प्राथमिक संघात निवड झालेल्या गोलंदाज डेविड विली, फलंदाज जो डेंली आणि अ‍ॅलेक्स हेल्स या खेळाडूंना वगळण्यात आले असून, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, अष्टपैलू लियम डॉसन आणि फलंदाज जेम्स विंस यांना अंतिम संघात स्थान मिळाले आहे. आर्चरला या संघात संधी मिळेल हे अपेक्षित होते, पण विलीला संघातून वगळण्यात आल्याने इंग्लंडमधील क्रिकेट समीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

बार्बाडोसमध्ये जन्मलेला आर्चर यावर्षी मार्च महिन्यात इंग्लंडकडून खेळण्यासाठी पात्र झाला. मात्र, एकही आंतराराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नसल्याने त्याला विश्वचषकाच्या प्राथमिक संघात स्थान मिळाले नव्हते, परंतु आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांत त्याला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी देण्यात आली होती. त्याने ३ एकदिवसीय सामन्यांत ३ विकेट आणि एका टी-२० सामन्यात २ विकेट घेत या संधीचा चांगला वापर केल्याने त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आहे. तसेच त्याने याआधी स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्येही चांगले प्रदर्शन केले आहे.

- Advertisement -

इंग्लंड संघ : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेरस्टोव, जेम्स विंस, जो रूट, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, लियम डॉसन, मोईन अली, आदिल रशीद, लियाम प्लंकेट, टॉम करन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -