Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा सफेद जर्सी घालण माझ्यासाठी गौरवाची गोष्ट - टी. नटराजन

सफेद जर्सी घालण माझ्यासाठी गौरवाची गोष्ट – टी. नटराजन

Related Story

- Advertisement -

येणारे दिवस हे माझ्यासाठी आव्हानाचे आहेत. पण या आव्हानांसाठी मी तयार असल्याचे भारताचा जलदगती गोलंदाज टी नटराजनने स्पष्ट केले आहे. यॉर्कर सेन्सेशन म्हणून टी नटराजनची ओळख आहे. भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाल्यानेच आता टी नजराजनला संधी देण्यात आली आहे. उमेशच्या जागी डावखुऱ्या टी नटराजनला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात दुसऱ्याच कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या मोहम्मद शमीची जागा मुंबईचा शार्दुल ठाकुर घेणार आहे.

- Advertisement -

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने टी नटराजन भारतीय संघाची गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. टी नजराजनने नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. एकापाठोपाठ एक असे दोन वेगवान गोलंदाज दुखापग्रस्त झाल्यानेच टी नटराजनला ही सफेद जर्सी घालण्याची आयती संधी चालून आली आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच अखेरच्या एकदिवस सामन्यात भारतीय संघात पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाविरोधातच टी २० मालिकेतील तीन सामन्यात सहा विकेट्स घेऊन त्याने सर्वांचेच लक्ष वेधले होते. या कामगिरीच्या जोरावरच त्याची आता भारतीय संघात निवड झाली आहे.

- Advertisement -