घरक्रीडाकृणाल पांड्याचा जेकब मार्टिनना मदतीचा हात

कृणाल पांड्याचा जेकब मार्टिनना मदतीचा हात

Subscribe

भारताचे माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन हे अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बडोद्याच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी होणारा खर्च खूप जास्त असल्याने त्यांच्या पत्नीने बीसीसीआयकडे मदत मागितली होती आणि बीसीसीआयने त्यांना मदत केलीही. त्याचसोबत बडोदा क्रिकेट असोसिएशन तसेच अनेक आजी-माजी खेळाडूंनीही त्यांना आर्थिक मदत केली.

या खेळाडूंमध्ये सौरव गांगुली, इरफान पठाण, युसूफ पठाण, झहीर खान, आशिष नेहरा या क्रिकेटपटूंचा समावेश होता. यात भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्यानेही मदतीसाठी हात पुढे केला आहे. कृणालने मार्टिन यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून ब्लँक चेक (बिनरकमी धनादेश) दिला आहे. तसेच, त्याने मार्टिन यांच्या पत्नीला उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम त्या चेकवर लिहा. मात्र, ती रक्कम कृपया १ लाख रुपयांपेक्षा कमी नको, असेही सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -