घरक्रीडाजालिंदर आपकेने पटकावला परळ श्रीचा किताब

जालिंदर आपकेने पटकावला परळ श्रीचा किताब

Subscribe

परळच्या हर्क्युलस फिटनेसचा शरीरसौष्ठवपटू जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडीत काढत परळ श्रीचा किताब पटकावला. ही स्पर्धा जिंकल्यामुळे तो रॉयल एनफिल्ड बाईकचा मानकरी ठरला. तसेच त्याला हनुमानाची मूर्ती पुरस्काराच्या रूपात देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई शहरातील म्हणजेच कुलाबापासून चेंबूरपर्यंत रहात असलेल्या स्थानिक शरीरसौष्ठवपटूंनाच प्रवेश देण्यात आला होता.

परळ श्री स्पर्धेत अव्वल दहा (टॉप टेन) खेळाडूंनाच रोख पुरस्कार मिळतील असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, या स्पर्धेसाठी ५६ खेळाडूंनी आपली उपस्थिती नोंदवल्यामुळे मनीष आडविलकर यांनी या स्पर्धेत अव्वल दहाऐवजी अव्वल वीस खेळाडूंना रोख पुरस्कार मिळतील, असे जाहीर केले. या ५६ खेळाडूंमधून आधी ३० खेळाडू आणि मग त्यातून २० खेळाडूंची निवड करण्यात आली. अव्वल दहामधील पहिल्या सहा खेळाडूंमध्ये चांगलीच चुरस दिसली.

- Advertisement -

गेल्यावर्षी मुंबई श्री झालेल्या सुजन पिळणकरने पाचवा क्रमांक मिळवला. सुशांत पवार चौथा तर दीपक तांबीटकर तिसरा आला. गतविजेता आणि महाराष्ट्र श्रीच्या ८५ किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी करणार्‍या सुशील मुरकरकडे सर्वांचेच लक्ष लागले होते, पण प्रशिक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेल्या जालिंदर आपकेने मुरकरवर मात करत परळ श्रीचा किताब मिळवला.

अव्वल दहा (टॉप टेन) विजेते :

- Advertisement -

१] जालिंदर आपके (हर्क्युलस फिटनेस), २] सुशील मुरकर (आरकेएम), ३] दीपक तांबीटकर (रिजस फिटनेस), ४] सुशांत पवार ( बॉडी गॅरेज), ५] सुजन पिळणकर (परब फिटनेस), ६] सुशांत रांजणकर (आर. एम. भट), ७] राजेश तारवे (शाहूनगर व्यायामशाळा), ८] अर्जुन कुंचिकुरवे (गुरूदत्त व्यायामशाळा), ९] अमोल गायकवाड (रिसेट फिटनेस), १०] संदीप कवडे (एचएमवी फिटनेस).

’परळ श्री’ फिटनेस फिजीकचे अव्वल सहा खेळाडू :

१] रोहन कदम (आर. के. फिटनेस), २] लवलेश कोळी (गुरूदत्त जिम), ३] निलेश गिरी(आर. के. फिटनेस), ४] मोहम्मद अन्सारी (आय फ्लेक्स), ५] अनिकेत चव्हाण (रिजस फिटनेस), ६] सरवर अन्सारी (आर.एम.भट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -