घरक्रीडाIND vs AUS : टीम इंडियाला मोठा झटका, बुमराह चौथ्या कसोटीतून आऊट

IND vs AUS : टीम इंडियाला मोठा झटका, बुमराह चौथ्या कसोटीतून आऊट

Subscribe

भारताच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीची सोमवारी सांगता झाली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेला हा सामना भारतीय संघ गमावणार असे वाटत होते. मात्र, फलंदाजांच्या झुंजार खेळामुळे भारताने हा सामना अनिर्णित राखला. भारताच्या या यशात चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, हनुमा विहारी आणि अश्विन यांनी महत्वाची भूमिका बजावली. मात्र, या कसोटीदरम्यान पुजारा वगळता इतर तिघांना दुखापती झाल्या. पंत आणि अश्विन चौथ्या कसोटीपूर्वी फिट होण्याची अपेक्षा आहे. मात्र, विहारी या सामन्याला मुकणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातच आता भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सामना खेळण्याबाबत साशंकता आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून मालिकेतील चौथी आणि अंतिम कसोटी १५ जानेवारीपासून ब्रिस्बन येथे खेळली जाणार आहे. परंतु, या कसोटीसाठी तयारी करताना भारताला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार हे भारताचे खेळाडू मालिकेपूर्वीच, तर मोहम्मद शमी, लोकेश राहुल, उमेश यादव मालिकेदरम्यान जायबंदी झाले. त्यामुळे त्यांना या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.

- Advertisement -

सिडनी कसोटीत जाडेजा, विहारी आणि बुमराह यांना दुखापती झाल्या. जाडेजा आणि विहारी हे दोघेही ब्रिस्बन कसोटीला मुकणार आहेत. त्यातच आता भारताच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून बुमराह चौथ्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता आहे. बुमराह जायबंदी असून पुढील कसोटीआधी पूर्णपणे फिट होणार नाही. त्याने आतापर्यंत या मालिकेत ११ विकेट घेतल्या आहेत. तसेच सध्याच्या घडीला त्याची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. त्यामुळे तो चौथ्या कसोटीला मुकल्यास त्याची उणीव भारतीय संघाला भासेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -