झारखंड पराभूत

महाराष्ट्राचा ८ गडी राखून विजय, अझिम काझी सामनावीर , मोसमातील महाराष्ट्राचा पहिला विजय मिळवून ६ गुणांची कमाई,महाराष्ट्राला विजय मिळवून देणारे नौशाद शेख आणि अंकित बावणे

Mumbai
महाराष्ट्राचा विजयी संघ

झारखंडने शेवटच्या 7 षटकात ४८ धावांचे ठेवलेले लक्ष्य महाराष्ट्राच्या संघाने २ गडी गमावून आणि 7 चेंडू बाकी ठेवून या मोसमातील पहिला विजय येथील रिलायन्स मैदानावर साकार केला. विजयामुळे संघाला ६ गुण मिळाले. महाराष्ट्र्राच्या अझिम काझीने पहिल्या डावात केलेले शतक आणि दोन बळी मिळविल्याने त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

मंगळवारी शेवटच्या दिवशी नाझिम आणि उत्कर्ष सिंग यांनी १ बाद ४७ वरून डाव पुढे चालू केला. त्यावेळी डावाच्या पराभवापासून वाचण्यासाठी झारखंडला २२७ धावांची गरज होती. फलकावर ५९ धावा झाल्या असताना मोहम्मद नाझिम ३१ धावा काढून झेलबाद झाला. तर तिसरी विकेट ७४ धावांवर उत्कर्ष सिंग याची पडली. ११५ धावा झाल्या असताना विराट सिंग २७ धावा काढून पायचीत झाला. मात्र कर्णधार सौरभ तिवारी आणि कुमार सुरज यांची जोडी जमल्याने महाराष्ट्र विजयापासून दूर जात असे दिसत असताना २५४ धावांवर तिवारी झेलबाद झाला. त्याने वैयक्तिक ८७ धावा केल्या. उर्वरित सहा फलंदाजांनी ५७ धावांची भर टाकली.

कुमारने वैयक्तिक ९२ धावा केल्या. पहिल्या डावात 5 बळी घेणार्‍या सत्यजित बच्छावने दुसर्‍या डावातसुद्धा चार बळी घेतले. झारखंडचा डाव ३११ धावांवर संपुष्टात येऊन त्यांनी 7 षटकात ४८ धावा काढून निर्णायक विजय मिळविण्याचे महाराष्ट्रापुढे आव्हान ठेवले होते. संघाच्या १० धावा झाल्या असताना स्वप्निल गुगले ३ धावा काढून बाद झाला. काझीच्या जोडीला आलेल्या नौशाद शेखने फटकेबाजीला सुरुवात केल्याने विजय जवळ आल्याचे वाटत असताना काझी ९ धावांवर बाद झाला आणि महाराष्ट्राची २ बाद २७ अशी अवस्था झाली होती.

मात्र नंतर आलेल्या कर्णधार अंकित बावणे आणि नौशाद जोडीने ५.५षटकांत ४८ धावा काढून संघाचा विजय साकारला. नौशादने दोन, तर बावणेने एक षटकार मारला. विजयानंतर बावणेने रिलायन्सचे मैदान उत्तम असल्याची भावना व्यक्त करताना नागोठण्यातील पहिला विजय आमच्यासाठी अविस्मरणीय ठरल्याचे सांगितले.

झारखंड (दुसरा डाव) — ( १ बाद ४७ पासून पुढे )
नाझिम झे. नौशाद शेख गो. मुकेश चौधरी ३१
उत्कर्ष सिंग झे. विशांत मोरे गो. चौधरी २२
विराट सिंग पायचीत गो. गुगले २७
सौरभ तिवारी झे. झोपे गो. मनोज इंगळे ८७
कुमार सूरज झे. नौशाद गो. बच्छाव ९२
सुमित कुमार पायचित गो. बच्छाव २७
अनुकूल रॉय झे. इंगळे गो. बच्छाव ०
वरुण एरॉन झे. बावणे गो. अझिम काझी १
राहुल शुक्ला पायचित गो. चौधरी १
अजय यादव नाबाद १

गोलंदाजी – मुकेश चौधरी – १७.१- ०६ – ४९ – ०३
सत्यजित बच्छाव – ३६ – ०१ – १२४- ४
अझिम काझी – १५ – ०१ – ४९ – ०१
स्वप्निल गुगले २२ – ०४ – ५७ – ०१
मनोज इंगळे ०७ – ०१ – २८- ०१
नौशाद शेख ,०१ – ०० – ०१ – ००
अवांतर – ५

महाराष्ट्र (दुसरा डाव )
स्वप्निल गुगले झे. सुमित कुमार गो. राहुल शुक्ला १०
अझिम काझी झे. विराट सिंग गो. राहुल शुक्ला ०९
नौशाद शेख नाबाद २६
अंकित बावणे नाबाद ०७
गोलंदाजी – राहुल शुक्ला ०३ – ० – २४ – ०२
वरुण एरॉन २.५ – ० – २३ – ००
अवांतर – ३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here