घरक्रीडाआंतरराष्ट्रीय टी-२० मधून झुलन गोस्वामीची निवृत्ती

आंतरराष्ट्रीय टी-२० मधून झुलन गोस्वामीची निवृत्ती

Subscribe

भारतीय संघाची सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून झुलन गोस्वामीची ओळख असून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय टी - २० मधून निवृत्ती घेतली आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीममधील अनुभव जलद बॉलर झुलन गोस्वामीनं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३५ वर्षीय झुलननं ६८ टी – २० मॅचमध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट्सदेखील समाविष्ट आहेत. २००६ मध्ये इंग्लंडविरुद्ध टी – २० मध्ये झुलननं पदार्पण केलं आणि २०१८ मध्ये जूनमध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटची टी – २० मॅच खेळली होती. आयसीसीच्या अधिकृत हँडलवरून झुलनच्या निवृत्तीचं ट्विट करण्यात आलं आहे. भारतीय संघाची सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून झुलन गोस्वामीची ओळख असून निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना झुलनने, बीसीसीआय व आपल्यावर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत.

पद्मश्रीनं सम्मानित आहे झुलन

वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या झुलननं १६९ मॅचेसमधून २०३ विकेट्स घेतल्या आहेत. तर १० टेस्ट मॅचमध्ये ४० विकेट्स घेतल्या आहेत. टी – २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक ५६ विकेट्चा विक्रम झुलनच्या नावे आहे. तर वनडेमधील सर्वाधिक २०३ विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्डही तिच्याच नावे आहे. असा रेकॉर्ड असणाऱ्या झुलनला पद्मश्री पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं आहे. मागच्या वर्षीच तिला सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटरचा सन्मानदेखील मिळाला होता. दरम्यान २००७ मध्ये आयसीसी क्रिकेटर ऑफ द इअर हादेखील पुरस्कार झुलननं मिळवला असून २००७ मध्येच वुमन्स क्रिकेटर ऑफ द इअर म्हणून पुरस्कार मिळाल्यावर तिला भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन बनवण्यात आलं होतं. शिवाय २०१० मध्ये तिला अर्जुन पुरस्कारानंदेखील सन्मानित करण्यात आलं.

- Advertisement -

१५ व्या वर्षी केली क्रिकेटला सुरुवात

झुलन पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्माला आली. तिची सुरुवात फुटबॉल आवडीपासून झाली. मात्र १९९७ मध्ये अचानकपणे ती १५ वर्षांची असताना ईडन गार्डनवर झालेल्या महिला वर्ल्ड कपमध्ये बॉलगर्ल म्हणून तिनं काम केलं आणि त्यानंतर बेलिंडा क्लार्क, डेबी हॉकी यासारख्या खेळाडूंना पाहून तिनं क्रिकेटमध्येच आपलं करिअर करण्याचं ठरवलं. कोलकत्यापासून ८० किलोमीटरवर राहणारी झुलन रोज सकाळी ४.३० वाजता उठून सरावासाठी जात होती. अतिशय कठोर मेहनतीनं तिनं ही जागा मिळवली आहे. दरम्यान क्रिकेट वर्तुळात झुलन कोजी या नावानं प्रसिद्ध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -