जुनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला प्रारंभ

270 स्पर्धक सहभागी

Mumbai
राज्य ज्युनिअर कॅरम स्पर्धेचा शुभारंभ करताना आमदार प्रशांत ठाकूर आणि अरुण केदार. (छाया ः जितू शिगवण)

जुनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेस मंगळवारपासून येथे प्रारंभ झाला. राज्यातील 270 कॅरम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने क्रीडा भुवन येथे ही 55 वी सब ज्युनिअर आणि ज्युनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अरुण केदार, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र असोसिएशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुळे, छत्रपती पुरस्कार विजेते नथुराम पाटील, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी यतीन ठाकूर, भाजपचे अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, नंदकुमार चाळके, स्पर्धेचे पंचप्रमुख परविंदरसिंग, सह पंचप्रमुख योगश फणसाळकर, सुहास कारभारी, जिल्हा कॅरम असोसिएशनचे कार्यवाह दीपक साळवी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here