घरक्रीडाली-निंग कंपनीने केला श्रीकांतशी ३५ कोटींचा करार

ली-निंग कंपनीने केला श्रीकांतशी ३५ कोटींचा करार

Subscribe

चिनी कंपनी ली-निंगने श्रीकांतसोबत चार वर्षे आणि ३५ कोटींचा करार केला आहे.

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने मागील काही वर्षांत खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याला मिळालेल्या यशामुळेच त्याने अनेक चाहते मिळवले आहेत, तसेच बॅडमिंटनचा भारतात प्रसारही वाढला असल्याने मोठ्या कंपन्या त्याला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळेच आता चिनी कंपनी ली-निंगने श्रीकांतसोबत चार वर्षे आणि ३५ कोटींचा करार केला आहे.

ली-निंग ही स्पोर्ट्स कंपनी चीन, इंडोनेशिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या बॅडमिंटन संघाची प्रायोजक आहे, तसेच ही कंपनी २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियाडसाठी भारतीय संघाची प्रायोजक होती. ते भारतीय संघाचे २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकपर्यंत प्रायोजक आहेत. या ऑलिम्पिकमध्ये श्रीकांतला पदक जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

- Advertisement -

श्रीकांत हा सहा सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने २०१८ मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने मागील वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक आणि पुरुष एकेरीमध्ये रौप्यपदक मिळवले होते, तसेच त्याने मलेशिया ओपन आणि डेन्मार्क ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. तो पुढील काही वर्षांतही चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा असल्यानेच ली-निंग या कंपनीने त्याच्याबरोबर इतका मोठा करार केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -