घरक्रीडाबुवा साळवी कबड्डीचे तारणहार

बुवा साळवी कबड्डीचे तारणहार

Subscribe

ओम कबड्डी प्रबोधधिनीच्या १६व्या वर्धापन दिनानिमित्त हिरा तिरोडकर, मंदा परब, अमर पवार आणि केसरीनाथ पवार या जेष्ठ खेळाडूंना गौरविण्यात आले. यावेळी आज कबड्डीला जे चांगले दिवस आले आहेत, त्याचे श्रेय बुवा साळवी यांना जाते, असे उद्गार केसरीनाथ पवार यांनी काढले.

आज आपण कबड्डीमध्ये जे चांगले दिवस पाहत आहोत, त्याचे श्रेय बुवा साळवी, त्यांना मदत करणारे त्यांचे सहकारी, वेगवेगळ्या आस्थापनातून खेळाडूंना नोकरी उपलब्ध करून देणारे कबड्डीप्रेमी यांना देणे मी उचित समजतो. हूतुतू-कबड्डीच्या वादात बुवांना खंदे सहकारी मिळाले त्यामुळेच कबड्डीचा प्रसार, प्रचार झाला आणि हा खेळ एशियाडपर्यंत पोहोचला, असे केसरीनाथ पवार म्हणाले.

- Advertisement -

या सर्व खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत उत्तम कामगिरी करूनही हे खेळाडू शासनाच्या पुरस्कारापासून वंचित राहिले, अशी खंत या कार्यक्रमादरम्यान समाजसेवक भाऊसाहेब सांगळे यांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमाला आजी-माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच माजी नगरसेवक अरविंद बने, समाजसेवक भाऊसाहेब सांगळे, माया मेहर (अर्जुन पुरस्कार), तारक राऊळ, सिताराम साळुंखे, चित्राताई केरकर-नाबर, रविंद्र करमरकर(सर्व शिवछत्रपती पुरस्कार), मुंबई शहर कबड्डी असो.चे कार्याध्यक्ष मनोहर इंदुलकर, मुंबई उपनगर कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाह रमेश हरयाण, मिनानाथ धानजी यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -