Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Thailand Open : किदाम्बी श्रीकांत, सायना नेहवालची विजयी सलामी 

Thailand Open : किदाम्बी श्रीकांत, सायना नेहवालची विजयी सलामी 

श्रीकांतने भारताच्याच सौरभ वर्मावर मात केली.

Related Story

- Advertisement -

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी थायलंड ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात केली. कोरोना चाचणीच्या घोळाची या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बरीच चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी मात्र भारताच्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत श्रीकांतने भारताच्याच सौरभ वर्मावर २१-१२, २१-११ अशी सरळ गेममध्ये मात केली. पारुपल्ली कश्यपला मात्र दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील सामन्याच्या मध्यातून माघार घ्यावी लागली. जेसन अँथनी हो-शुईविरुद्ध पहिला गेम ९-२१ असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये कश्यपने दमदार पुनरागमन केले. त्याने हा गेम २१-१३ असा जिंकत सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या गेममध्ये कश्यप ८-१४ असा पिछाडीवर होता. त्यावेळी पायाला दुखापत झाल्याने त्याने सामन्यातून माघार घेतली.

दुसरीकडे सायना नेहवालला या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यात यश आले. तिने पहिल्या फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या किसोना सेल्वाडूरेचा २१-१५, २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला. तिचा दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानशी सामना होईल. बुसाननने पहिल्या फेरीत सब्रीना जाकेटवर २१-१६, २१-१७ अशी मात केली. तसेच पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीनेही विजयी सलामी दिली. त्यांनी पहिल्या फेरीत किम जी युंग आणि ली याँग डे या दक्षिण कोरियाच्या जोडीवर १९-२१, २१-१६, २१-१४ असा विजय मिळवला.

- Advertisement -