Real Champion! कोरोनाग्रस्तांसाठी १५ वर्षीय शूटरने केली ३० हजारांची मदत

वयाच्या मानाने केलेली मदत पाहून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी इशा सिंहचे केले कौतुक

Mumbai
कोरोनाग्रस्तांसाठी १५ वर्षीय शूटरने केली ३० हजारांची मदत

संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या भितीने हादरून गेला आहे. या परिस्थितीत कोणतीही मदत जर आपल्याला करायची असेल तर वयाची मर्यादा नसते. याचच उदाहरण म्हणजे फक्त वयवर्ष १५ असणाऱ्या शूटर इशा सिंह हिने आपल्या सेव्हिंग्समधून ३० हजार रूपये कोरोनाशी लढण्यासाठी दिले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाकार्याचे आवाहन केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपल्या परीने सहकार्य करत आहेत.

रविवारी १५ वर्षीय शूटर इशा सिंह हिने ३० हजारांची मदत दिली आहे. ‘माझ्या सेव्हिग्समधून हा ३० हजार रुपयांचा निधी देत आहे.’, असे सांगत तिने आपली मदत पोहोचावी म्हणून सोशल मीडियावर ट्विट केले आहे.

वयाच्या मानाने केलेली मदत पाहून केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी इशा सिंह हिचे कौतुक देखील केले आहे. त्यांनी हे ट्विट करताना असे म्हटले आहे की, ‘१५ वर्षांची असतानाही तू मदतीसाठी पुढे आलीस याबद्दल तुझं कौतुक आहे. तू Real Champion आहे.’

गरजूंना गांगुलीने केली ५० लाखांची मदत 

भारताचा माजी कर्णधार आणि डावखुरा सलामीचा फलंदाज सौरभ गांगुली आपल्या क्रिकेटमधील कामगिरीच्या निवृत्तीनंतरही काही ना काही कारणाने सामाजिक जीवनातही चर्चेत असते. अशीच चमकदार कामगिरी करणाऱ्या सौरभ गांगुलीने करोनासारख्या संकटाच्या काळातही आपल्या मनाचा दादापणा दाखवून दिला आहे. करोनाचा लढाईत गरजूंना ५० लाखांची मदत सौरभ गांगुलीने केली आहे. या ५० लाख रूपयांचा तांदुळ गरजूंना देण्यात येणार आहे.


करोनासाठी एमसीएकडून सरकारला ५० लाखांची मदत!