KKR vs KXIP Live Update : पंजाबचा पराभव 

आज आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध पंजाब असा सामना होत आहे. 

kl rahul and mayank agarwal
मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल

अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना पंजाबला ११ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांनी हा सामना गमावला.


लोकेश राहुल ७४ धावांवर बाद. पंजाबला अखेरच्या षटकात १४ धावांची गरज.


निकोलस पूरनला (१६) नरीनने पाठवले माघारी.


मयांक ५६ धावांवर बाद.


राहुल आणि मयांकचे अर्धशतक. राहुलचे ४२, तर अगरवालचे ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण.


पंजाबच्या ५० धावा सातव्या षटकात पूर्ण.


पॉवर-प्लेच्या सहा षटकांनंतर पंजाब बिनबाद ४७.


सलामीवीर लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी पंजाबच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली.


कोलकाताने २० षटकांत ६ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली.


कार्तिकने यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने २९ चेंडूत ५८ धावांची खेळी केली.


कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकची चांगली फलंदाजी.


शुभमन गिल ५७ धावांवर धावचीत.


सलामीवीर शुभमन गिलचे अर्धशतक. ४२ चेंडूत पूर्ण केल्या ५० धावा.


इयॉन मॉर्गन २४ धावा करून बाद झाला. लेगस्पिनर रवी बिष्णोईने त्याला ग्लेन मॅक्सवेलकरवी झेलबाद केले.


राहुल त्रिपाठी (४), नितीश राणा (२) झटपट माघारी परतले.


कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाची अडखळती सुरुवात झाली.


पंजाबचा सलामीवीर क्रिस गेलला आजही संधी नाही.


कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकचा फलंदाजीचा निर्णय.


आज आयपीएलमध्ये दुपारी होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सपुढे किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे आव्हान आहे.