घरIPL 2020IND vs AUS : कसोटीत पुन्हा संधी मिळणे हे लोकेश राहुलचे 'नशीब' - मांजरेकर

IND vs AUS : कसोटीत पुन्हा संधी मिळणे हे लोकेश राहुलचे ‘नशीब’ – मांजरेकर

Subscribe

राहुलला मागील वर्षी कसोटी संघातून वगळण्यात आले होते.

भारतीय पुरुष क्रिकेट संघ यावर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारताचे एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी असे तिन्ही संघ जाहीर केले. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये मागील काही काळ सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले. राहुलला मागील वर्षी कसोटी संघातून वगळण्यात आले होते. परंतु, सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे त्याचा सध्याचा फॉर्म लक्षात घेऊन त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे कसोटी संघात एखाद्या खेळाडूला स्थान देणे योग्य नसल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरला वाटते.

चुकीचा पायंडा पाडत आहात

‘आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर तुम्ही खेळाडूला कसोटी संघात पुन्हा स्थान देऊन चुकीचा पायंडा पाडत आहात. खासकरून जेव्हा त्या खेळाडूला मागील काही कसोटी सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. आता पुढे जाऊन या खेळाडूला यश मिळेलही, पण अशाप्रकारे खेळाडूची कसोटी संघात निवड होणे हे रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या दृष्टीने निराशाजनक आहे,’ असे मांजरेकरने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

संधीचे सोने करेल अशी आशा

तसेच आणखी एका ट्विटमध्ये संजय मांजरेकर म्हणाला, ‘मागील पाच कसोटी मालिकांमधील राहुलची कामगिरी – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७.१ ची सरासरी, इंग्लंडविरुद्ध २९ ची सरासरी, वेस्ट इंडिजविरुद्ध १८ ची सरासरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०.७ ची सरासरी, वेस्ट इंडिजविरुद्ध २५.४ ची सरासरी. आयपीएल आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे कसोटी संघात संधी मिळणे हे राहुलचे नशीब आहे. मात्र, या संधीचे तो सोने करेल अशी मला आशा आहे.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -