घरक्रीडाकोहली, बुमराह एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

कोहली, बुमराह एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी कायम

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा भारताचा रोहित शर्मा फलंदाजांच्या क्रमवारीत दुसर्‍या स्थानी आहे. तसेच संघांच्या क्रमवारीत विश्वविजेता इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानी, भारतीय संघ दुसर्‍या स्थानी आहे, तर उपविजेता न्यूझीलंड तिसर्‍या स्थानी आहे.

फलंदाजांमध्ये पहिल्या स्थानी असणार्‍या कोहलीच्या खात्यात ८८६ गुण आहेत. विराटला विश्वचषकात एकही शतक करता आले नाही, पण त्याने सलग ५ अर्धशतके लगावण्याचा पराक्रम केला. त्यामुळेच त्याने आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताचाच रोहित शर्मा दुसर्‍या स्थानी असून त्याचे ८८१ गुण आहेत. विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या खात्यात ७९६ गुण असून तो सहाव्या स्थानी आहे. तसेच इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने २० व्या स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला एका स्थानाची बढती मिळाली आहे. ७९४ गुणांसह तो सातव्या स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने अव्वल दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे.

- Advertisement -

सध्याच्या घडीला जगातील गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमराह गोलंदाजांच्या क्रमवारीत ८०९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारे मॅट हेन्री आणि क्रिस वोक्स यांनी अनुक्रमे दहाव्या आणि सातव्या स्थानी झेप घेतली आहे. या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स मिळवणारा मिचेल स्टार्क आठव्या स्थानी असून त्याच्या खात्यात ६६३ गुण आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -