कोहलीची कर्णधार म्हणून धोनीशी तुलना होऊच शकत नाही

गौतम गंभीर

Mumbai
Gautam Gambhir

भारताचा माजी फलंदाज आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीरच्या मते भारताचा कर्णधार विराट कोहलीची महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्याशी कर्णधार म्हणून तुलनाच होऊ शकत नाही. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने तर रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ३-३ वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवले आहे.

माझ्या मते कोहली हा चतुर कर्णधार नाही. तो रणनीतीमध्येही चुका करू शकतो आणि त्याने आयपीएल एकदाही जिंकलेले नाही. कर्णधार तितकाच चांगला जितका त्याचा विक्रम. आयपीएलमध्ये असेही कर्णधार आहेत ज्यांनी ही स्पर्धा ३-३ वेळा जिंकली आहे. जसेकी धोनी आणि रोहित. त्यामुळे जोपर्यंत तो त्यांना गाठत नाही, तोपर्यंत त्याची धोनी आणि रोहितशी तुलना होऊ शकत नाही. तो मागील ७-८ वर्षे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार आहे. कोहलीने त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी त्याला कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. कारण तुम्ही एकदाही जेतेपद न मिळवता इतकी वर्षे कर्णधार राहता असे फार वेळा पहायला मिळत नाही, असे गंभीर म्हणाला.

सौरव गांगुलीने मात्र कोहलीला पाठिंबा दर्शवला आहे. विराट कोहलीची कामगिरी अफलातून आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे. त्यानेच आरसीबीचा कर्णधार असायला हवे, असे गांगुलीने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here