घरक्रीडाकोहलीशी माझी तुलना होऊ शकत नाही !

कोहलीशी माझी तुलना होऊ शकत नाही !

Subscribe

पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझमने मागील दीड-दोन वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१.२९ च्या तर टी-२० क्रिकेटमध्ये ५३. ७२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानच्या द.आफ्रिका दौर्‍यात त्याने टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो दुसर्‍या स्थानी होता. त्याच्या या कामगिरीमुळेच पाकिस्तानमधील प्रसार माध्यमे आणि चाहते त्याची भारताचा कर्णधार विराट कोहलीशी तुलना करत होते. मात्र, कोहलीशी सध्यातरी माझी तुलना होऊ शकत नाही, अशी कबुली एका कार्यक्रमात बाबर आझमने दिली.

बर्‍याचदा लोक माझी कोहलीशी तुलना करतात. माझ्या मते तो खूपच उत्कृष्ट खेळाडू आहे आणि सध्यातरी माझी त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. माझी कारकीर्द आताशी सुरू झाली आहे. दुसरीकडे कोहलीने खूप विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्याच्या प्रदर्शनात सातत्य आहे. त्यामुळे माझी त्याच्याशी तुलना होण्यासाठी मलाही तशी कामगिरी करायला हवी. मला त्याच्यासारखेच प्रदर्शन करायला नक्की आवडेल, असे आझम म्हणाला.

- Advertisement -

आझमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होण्याआधीच पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी त्याची कोहलीशी तुलना केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण आझमची कोहलीशी तुलना करण्यासाठी जरा घाईच केली, असे म्हटले होते. मात्र, आझम भविष्यात जगातील सर्वोत्तम फलंदाज होऊ शकेल, असेही यावेळी आर्थर म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -