घरक्रीडाकोहली अव्वल स्थानी कायम

कोहली अव्वल स्थानी कायम

Subscribe

कसोटी क्रमवारीत स्मिथने टाकले पुजाराला मागे

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराची मात्र चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके केल्याने त्याला एका स्थानाची बढती मिळाली असून तो तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.

कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर असणार्‍या कोहलीच्या खात्यात ९२२ गुण आहेत. दुसर्‍या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचे ९१३ गुण आहेत. तर १५ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणार्‍या स्मिथच्या खात्यात ९०३ गुण आहेत. या सामन्याआधी त्याच्या खात्यात ८५७ गुण होते. ९०० हून अधिक गुण असणारे हे केवळ तीन फलंदाज आहेत. चौथ्या स्थानावर घसरण झालेल्या पुजाराचे ८८१ गुण आहेत. इंग्लंडकडून पहिल्या अ‍ॅशेस कसोटीत शतक झळकावणारा रोरी बर्न्सला तब्ब्ल २५ स्थानांची बढती मिळाली असून तो ८१ व्या स्थानावर पोहोचला आहे.

- Advertisement -

गोलंदाजांमध्ये अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ९ विकेट्स पटकावणारा ऑस्ट्रेलियाचा नेथन लायनला सहा स्थानांची बढती मिळाली असून तो १३ व्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्याच पॅट कमिन्सने या सामन्यात ७ बळी मिळवत आपले अव्वल स्थान कायम राखले. त्याच्या खात्यात ८९८ गुण आहेत. भारताचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा या यादीत सहाव्या, तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन दहाव्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -