घरक्रीडाकोहलीची फिटनेसवरील मेहनत पाहून मला स्वतःची लाज वाटली!

कोहलीची फिटनेसवरील मेहनत पाहून मला स्वतःची लाज वाटली!

Subscribe

तमिम इक्बालची कबुली

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजच नाही, तर जगातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे खासकरुन भारत आणि आशियातील इतर देशांचे खेळाडू त्याचे अनुकरण करण्याचा, त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतात. बांगलादेशच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार तमिम इक्बालचाही या खेळाडूंमध्ये समावेश आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. तमिमने दोन वर्षांपूर्वी कोहली त्याच्या फिटनेसवर किती मेहनत घेत आहे हे पाहिले होते आणि त्याच्याच वयाचा असूनही आपण त्याच्याइतकी मेहनत घेत नसल्याची तमिमला लाज वाटली.

मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. भारत हा आमचा शेजारी देश आहे. त्यामुळे ते ज्या गोष्टी करतात, त्याचा परिणाम बांगलादेशवरही होतो. भारतीय संघावर आम्ही लक्ष ठेवून असतो. त्यांनी जेव्हा फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तेव्हा त्याचा परिणाम आमच्या संघावरही झाला. दोन-तीन वर्षांपूर्वी मी विराट कोहलीला मैदानाच्या फेर्‍या मारताना पाहिले होते. तो ज्याप्रकारे फिटनेसवर मेहनत घेत होता, ते पाहून मला स्वतःची लाज वाटली. विराट माझ्याच वयाचा आहे. मात्र, तो माझ्यापेक्षा खूप जास्त मेहनत घेत आहे. मी त्याच्याहून निम्माही सराव करत नाही असा मी स्वतःशी विचार केला. त्यानंतर मी स्वतःमध्ये बदल केला. आमच्या संघातही बरेच फिट खेळाडू आहेत. मुशफिकूर रहीम फिटनेसवर खूप मेहनत घेतो, असे तमिमने सांगितले. तो भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरशी बोलत होता.

- Advertisement -

कोहली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या सुरुवातीला फिटनेसबाबत तितकासा जागृत नव्हता. मात्र, २०१३ मध्ये त्याने फिटनेस, डाएट आणि सरावावर अधिक लक्ष केंद्रित केले. या बदलाचा कोहलीला खूप फायदा झाला आहे. तो आता जगातील सर्वात फिट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.

२०१५ वर्ल्डकपच्या वेळी वजन जास्त होते!

- Advertisement -

२०१५ विश्वचषकात माझे वजन आतापेक्षा ९ किलो जास्त होते. धावा होत आहेत ना, मग मी कसा दिसतो याने काय फरक पडतो असा मी पूर्वी विचार करायचो. ही मानसिकता चुकीची आहे. फिटनेस हा खेळाचा किती महत्त्वाचा भाग आहे हे कळण्यासाठी आम्हाला वेळ लागला. मात्र, मागील ३-४ वर्षांत आम्ही फिटनेसवर खूप मेहनत घेत आहोत. फिटनेसचे खूप फायदे आहेत. तुम्ही फिट असला, तर थकवा जाणवत नाही, तुम्ही चेंडूकडे लवकर पोहोचता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःला पाहून बरे वाटते, असे तमिमने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -