राजस्थान बॅक टू पॅवेलियन …

rajasthan royals team
राजस्थान रॉयल्सचा संघ

बुधवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सान्यात कोलकाताने राजस्थान विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे अकराव्या हंगामातील आयपीएलमधला राजस्थानचा प्रवास संपुष्टात आलेला आहे.
कोलकाताचे गोलंदाज राजस्थानवर भारी
सुरुवातीला कोलकाताने फलंदाजी करत राजस्थानसमोर १७० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी राजस्थान रॉयल्स मैदानात उतरले खरे, पण सामन्याच्या शेवटी कोलकाताच्या गोलंदाजांमुळे ते हे १७७ धावांचं आव्हान पेलू शकले नाही.
अजिंक्य रहाणे – संजू सॅमसनची भागीदारी व्यर्थ
राजस्थान रॉयल्सच्या राहुल त्रिपाठी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे या जोडीने आपल्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. राहुल त्रिपाठी माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली होती. मात्र, कोलकात्याच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आणि राजस्थानच्या फलंदाजांना एक-एक करुन तंबूत पाठवले.
शुक्रवारी सनरायजर्सशी सामना
अजिंक्य रहाणे माघारी परतल्यानंतर एकाही फलंदाजाचा कोलकाताच्या गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. कोलकाताच्या एकाही गोलंदाजाने राजस्थानच्या फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची संधीच दिली नाही. ज्यामुळे अखेर कोलकात्याने सामन्यात २५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेतलं आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकात्याकडून पियुष चावलाने सर्वाधिक २ बळी घेतले, तर कृष्णा आणि कुलदीप यादवने १ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
शुक्रवारी कोलकात्याचा सामना सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. या सामन्यात विजयी झालेला संघ अंतिम फेरीत चेन्नईविरुद्ध लढेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here