घरक्रीडाकोलकाताने करारमुक्त केल्याचे दुःख नाही!

कोलकाताने करारमुक्त केल्याचे दुःख नाही!

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज क्रिस लिनला आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) काही दिवसांपूर्वी करारमुक्त केले. पुढील महिन्यात खेळाडू लिलाव असून त्याआधी आयपीएलमधील आठही संघांनी काही खेळाडूंना संघाबाहेर केले, तर प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवले. कोलकाताच्या संघाने लिनसह रॉबिन उथप्पा आणि पियुष चावला या अनुभवी खेळाडूंना संघाबाहेर केल्याचे चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. मात्र, कोलकाताने करारमुक्त केल्याचे मला दुःख नाही, असे लिनने स्पष्ट केले.

कोलकाताचे संघमालक, संघ व्यवस्थापन आणि मुख्य प्रशिक्षकांशी माझे चांगले संबंध आहेत. कोलकाताने करारमुक्त केल्याचे मला दुःख नाही. काही संघांनी माझ्यापेक्षाही उत्तम खेळाडूंना संघाबाहेर केले आहे. कोलकाताचे आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य आहे आणि त्यादृष्टीने प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम संघ बांधणी करत आहे. आता लवकरच आयपीएलचा खेळाडू लिलाव होणार आहे. मी त्याआधी दमदार कामगिरी केल्यास मला दुसर्‍या संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकेल, असे लिन म्हणाला.

- Advertisement -

कोलकाताचा निर्णय चुकलाच – युवराज                                                                                      क्रिस लिनला संघाबाहेर करण्याचा कोलकाता नाईट रायडर्सचा निर्णय चुकीचा आहे, असे भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला वाटते. सध्या सुरू असलेल्या अबू धाबी टी-१० स्पर्धेत लिन आणि युवराज एकाच संघातून खेळत आहेत. लिनला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना मी पाहिले आहे. त्याने सलामीला येत कोलकाताला बर्‍याच सामन्यांत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र, असे असतानाही त्याला कोलकाताने करारमुक्त का केले, हे मला कळले नाही. माझ्या मते त्यांचा हा निर्णय चुकीचा आहे, असे युवराजने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -