घरक्रीडासायनाची माघार; श्रीकांतवर नजर

सायनाची माघार; श्रीकांतवर नजर

Subscribe

कोरिया मास्टर्स बॅडमिंटन

भारताची आघाडीची बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने मंगळवारपासून सुरु होणार्‍या कोरिया मास्टर्स वर्ल्ड टूर सुपर ३०० स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असणार्‍या सायनाला मागील काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ करता आलेला नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात लखनऊ येथे होणार्‍या सय्यद मोदी स्पर्धेआधी तिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाने माघार घेतल्यामुळे या स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताची एकही खेळाडू नसेल.

पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. श्रीकांतला यावर्षी सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नसली तरी त्याने मागील आठवड्यात झालेल्या हाँगकाँग ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्याचा पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या वॉन्ग विंग की व्हिन्सेंटशी सामना होईल. या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत १३ सामने झाले असून त्यापैकी १० सामने श्रीकांतने जिंकले आहेत. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत १६ व्या स्थानी असणार्‍या समीर वर्मासमोर पहिल्या फेरीत चीनच्या शी यु क्वीचे आव्हान असेल. सौरभ वर्माला मात्र मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागेल. शुभांकर डेचा पहिल्या फेरीत चीनच्या चेन लाँगशी सामना होईल. दुहेरीत भारताच्या एकाही जोडीने सहभाग घेतलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -