घरक्रीडाफ्रान्सच्या एमबापेने विश्वचषकातील सर्व कमाई केली दान

फ्रान्सच्या एमबापेने विश्वचषकातील सर्व कमाई केली दान

Subscribe

फ्रान्सचा फॉरवर्ड खेळाडू १९ वर्षीय कायलन एमबापेने विश्वचषकातून बक्षिसाच्या रूपात मिळालेली सर्व रक्कम दिव्यांग क्रीडापटूंच्या संस्थेला दान केली आहे.

नुकताच फिफाचा २१ वा विश्वचषक रशियात पार पडला असून फ्रान्सने दिमाखात विश्वचषक आपल्या नावे केला आहे. यावेळी विश्वचषकात फ्रान्सचा स्टार खेळाडू ठरलेल्या कायलन एमबापेने विश्वचषकातील बक्षीस रूपाने मिळालेली सर्व रक्कम प्रेयर्स डी कोर्डीस या सेवाभावी संस्थेला दान करणार असल्याची घोषणा केली आहे. ही संस्था दिव्यांग क्रीडापटूंच्या विकासासाठी काम करते. कायलनला विश्वचषकातून बक्षिस स्वरूपात जवळपास ५००,००० डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास साडेतीन करोड इतकी रक्कम मिळाली असून तो ही सर्व रक्कम दिव्यांग क्रीडापटूंना दान करणार आहे.

कायलनने ही रक्कम दान करताना असे सांगितलेकी, “देशासाठी खेळताना देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळते हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असून या कार्यासाठी बक्षीस किंवा पैसे घेणे मला पटत नाही म्हणून मी ही रक्कम दान करत आहे.” याआधीही कायलनने विश्वचषकातील प्रत्येक मॅचनंतर मिळणारी रक्कम दान केली होती. विश्वचषकातील एका मॅचची कायलनची कमाई २०,००० युरोस म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास १६,००,००० इतकी होती.

- Advertisement -

कायलन हा जगातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू असून तो सध्या लीग -१ मधील पॅरिस-सेन्ट जर्मन या क्लब साठी खेळतो. त्याने २०१७ मध्ये फ्रान्सकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. कायलन विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोल करणारा दुसरा सर्वात तरूण खेळाडू असून याआधी १९५८ मध्ये १७ वर्षाचे असताना ब्राझीलच्या पेले यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गोल केला होता. कायलनच्या या कार्यामुळे सर्व जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -