घरक्रीडामहिला हॉकी वर्ल्डकप; उपांत्य फेरीत भारत पराभूत

महिला हॉकी वर्ल्डकप; उपांत्य फेरीत भारत पराभूत

Subscribe

महिला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पेनल्टी शुटआऊटमध्ये आयलर्लंडने भारताना ३-१ असा पराभव केला आहे.

४४ वर्षांनंतर उपांत्य फेरीत दाखल होण्याचे भारताचे स्पप्न अधुरेच राहिले आहे. कारण, गुरूवारी आयर्लंड विरोधात झालेल्या सामन्यात शूटआउटमध्ये भारताला ३-१ अशा फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. आयर्लंडकडून भारताचा हा सलग तिसरा पराभव आहे. जागतिक क्रमवारीचा विचार करता भारतीय महिला हॉकी संघ दहाव्या तर आयर्लंड सोळाव्या स्थानावर आहे. गटामध्ये झालेल्या लढतीमध्ये देखील आयर्लंडने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय महिला संघ उत्युक होता. पण, त्यामध्ये भारताला काही यश आलेले नाही. गुरूवारच्या लढतीमध्ये दोन्ही संघांनी सुरूवातीला सावध पवित्रा घेत खेळाला सुरूवात केली. मात्र त्यानंतर आयर्लंडने केलेल्या आक्रमक खेळ केला. निर्धारीत वेळेत लढत बरोबरीमध्ये सुटली. त्यामुळे पेनल्टी शुटआऊटचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये भारताला ३-१ असा पराभव स्वीकार करावा लागला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -