घरक्रीडाअर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन

Subscribe

मॅराडोना यांनी अर्जेंटिनाकडून ९१ सामन्यांत ३४ गोल केले होते.

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी (आज) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मॅराडोना फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक मानले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वीच ते पुन्हा घरी परतले होते. मात्र, आज त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

- Advertisement -

मॅराडोना यांनी अर्जेंटिनाकडून ९१ सामन्यांत ३४ गोल केले होते. १९८६ चा वर्ल्डकप त्यांच्यासाठी आणि अर्जेंटिनासाठी अविस्मरणीय ठरला होता. मॅराडोना यांच्या दमदार खेळामुळे अर्जेंटिनाने वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. तसेच इंग्लंडविरुद्ध त्यांचा ‘हॅन्ड ऑफ गॉड’ कोणीही कधीही विसरू शकणार नाही. व्यावसायिक फुटबॉलमध्ये त्यांनी इटलीतील लोकप्रिय संघ नॅपोली, स्पॅनिश संघ बार्सिलोना यांचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच २०१० वर्ल्डकपमध्ये त्यांनी अर्जेंटिनाचे प्रशिक्षकपदही भूषवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -