घरक्रीडानिवृत्तीचा निर्णय धोनीलाच घेऊ द्या!

निवृत्तीचा निर्णय धोनीलाच घेऊ द्या!

Subscribe

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मागील काही काळात संथ फलंदाजीमुळे धोनीवर बरीच टीका झाली आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होईल असे म्हटले जात होते. मात्र, धोनीने अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. आगामी वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी धोनीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहेत. परंतु धोनीवर निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकणे अयोग्य ठरेल आणि हा निर्णय त्याच्यावरच सोडला पाहिजे, असे विधान बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी केले आहे.

धोनी हा महान खेळाडू आहे आणि तो देशासाठी कायमच निःस्वार्थीपणे खेळला आहे. माझ्या मते यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याची जागा घेण्यासाठी भारताकडे सध्यातरी योग्य पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे धोनीवर निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकणे योग्य ठरणार नाही. हा निर्णय त्याने स्वतःच विचार करून घेतला पाहिजे. मात्र, निवड समितीच्या सदस्यांनी त्याच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. धोनीच्या निवृत्तीबाबत काय योजना आहेत, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे, जे सचिन तेंडुलकरबाबत घडले होते, असे जगदाळे म्हणाले.

- Advertisement -

ढोनीच्या निवृत्तीबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही भाष्य केले. तो म्हणाला, आता भविष्याबाबत विचार करणे गरजेचे आहे, जे धोनीने कर्णधार असताना केले होते. आम्ही २००८ मध्ये सीबी मालिका खेळताना तो मला म्हणाला होता की ऑस्ट्रेलियाची मैदाने मोठी असल्याने सचिन आणि सेहवाग या मालिकेत एकत्र खेळू शकत नाही. त्याने विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना संधी दिली. त्याच्याबाबतही भावनिक निर्णय न घेता, व्यावहारिक निर्णय घेणे आवश्यक आहे. आता रिषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन यांना संधी देणे योग्य ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -