घरक्रीडालिटिल मास्टर सुनील गावस्करांचा ६९ वा वाढदिवस!

लिटिल मास्टर सुनील गावस्करांचा ६९ वा वाढदिवस!

Subscribe

सुनील गावस्करांवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही गावस्करांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सचिनने मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या सुनिल गावस्करांचा आज वाढदिवस.गावस्करांना भारतीय क्रिकेट मधील एक उत्तम बॅट्समन म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अप्रतिम बॉलर्सविरूद्ध दमदार अशी खेळी केली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत उत्तम बँटिगने अप्रतिम शॉट्सचा वर्षाव करणाऱ्या सुनील गावस्करांवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुनील गावस्कारांच्या कारकिर्दीचा आढावा

सुनिल गावस्करांनी १९७१ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ६ मार्च १९७१ रोजी वेस्ट इंडिजविरूद्ध गावस्करांनी आपला पहिला कसोटी सामना खेळला. तर १३ जुलै १९७४ ला इंग्लंडविरूद्ध त्यांनी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. गावस्करांनी १६ वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत १०८ एकदिवसीय सामन्यात ३५.१३ धावांच्या सरासरीने एकूण ३०९२ धावा केल्या आहेत. ज्यात २७ अर्धशतकांचा तर एका शतकाचा समावेश आहे. याचसोबत त्यांनी १२५ कसोटी सामन्यात ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा केल्या आहेत. ज्यात ४५ अर्धशतकांचा तर ३४ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात नाबाद १०३ हा त्यांचा सर्वाधिक स्कोर असून नाबाद २३६ हा त्यांचा कसोटी सामन्यातील सर्वाधिक स्कोअर आहे.

- Advertisement -
Sunil-Gavaskar
सुनील गावस्कर

वाचा- जाणून घ्या गावस्करांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी!!!

मास्टर-ब्लास्टरनेही दिल्या शुभेच्छा!

सुनील गावस्करांवर सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही गावस्करांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सचिनने अस्सल मराठी भाषेत शुभेच्छा देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -